-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. यामध्ये तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती.
-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर ७ ऑगस्टला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे.
-
अभिनेत्रीचा होणारा पती नेमका कोण आहे? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करत प्राजक्ताने तिच्या पतीचं नाव काय आहे हे सुद्धा सर्वांना सांगितलं आहे.
-
प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे शंभुराज.
-
अभिनेत्री साखरपुड्यासाठी ऑफ व्हाइट रंगाची डिझायनर साडी नेसून तयार झाली होती. यावर तिने लाल रंगाचा शेला घेतला होता. प्राजक्ताने साखरपुड्यासाठी रॉयल लूक केला होता.
-
अभिनेत्रीच्या ब्लाऊजवर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं ‘शंभुराज’ हे नाव कोरल्याचं दिसलं.
-
याशिवाय तिच्या पतीने सुद्धा त्याच्या शेरवानीवर ‘प्राजक्ता’चं नाव लिहिलं होतं.
-
प्राजक्ता व शंभुराज यांच्यावर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
दरम्यान, प्राजक्ताने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेसह ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, ‘आई माझी काळुबाई’ या मालिकांमध्येही काम केलेलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम, gauravkumbharphotography_ | मेकअप आर्टिस्ट : dhanwade mahendra )

अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या, पार्किंगच्या वादातून दोघांनी घरासमोरच केला हल्ला