-
प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) लवकरच ‘आतली बातमी फुटली’ या (Aatli Baatmi Futlii Marathi Movie) चित्रपटात झळकणार आहेत.
-
नुकतेच या चित्रपटातील ‘सखूबाई’ (Sakhubai Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
-
गौतमीने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थबरोबर धमाल-मस्ती करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या आगामी मराठी चित्रपटाचा रंजक टिझर अलिकडेच प्रदर्शित झाला होता.
-
वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट आहे.
-
एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.
-
सिद्धार्थबरोबर या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर हे कलाकार आहेत.
-
विनोदीशैलीतील गुन्हेगारीपट असणारा हा चित्रपट धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘आश्चर्यचकित’ करेल, असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी. गांधी यांनी व्यक्त केला आहे.
-
हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ जाधव/इन्स्टाग्राम)

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला