-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा ७ ऑगस्टला थाटामाटात पार पडला.
-
अभिनेत्रीच्या पतीचं नाव शंभुराज असून, या दोघांच्या साखरपुड्याला मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी, दोघांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
-
प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची चर्चा सुरू झाल्यावर तिचा नवरा नेमका कोण आहे याबद्दल सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
-
साखरपुडा पार पडल्यावर प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज असल्याचं सर्वांना समजलं. मात्र, शंभुराज नेमकं काय काम करतात, त्यांचा स्वभाव कसा आहे याबद्दल प्राजक्ताने स्वत: ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
-
प्राजक्ता गायकवाड म्हणते, “मला इंडस्ट्रीमधील जोडीदार नको होता. आमच्या दोघांचंही फिल्ड वेगळं आहे. ते बिझनेस करतात, त्यांचा फॅमिली बिझनेस सुद्धा आहे. खरंतर, मल्टिपल बिझनेस आहेत आणि त्यांचा कामावर प्रचंड फोकस असतो.”
-
होणाऱ्या नवऱ्याच्या स्वभावाविषयी सांगताना प्राजक्ता म्हणाली, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खूप जास्त समजूतदार आहेत, एखाद्याची कायम काळजी घेणारा असा त्यांचा स्वभाव आहे. माझ्यापेक्षा ते जास्त समजूतदार आहेत, मी थोडी चिडते पण ते फार शांत आहेत.”
-
या मुलाखतीत प्राजक्ता पहिल्या नजरेतच आवडल्याचं शंभुराज यांनी सांगितलं. त्यांनी अभिनेत्रीच्या घरी जाऊन रितसर तिला लग्नाची मागणी घातली होती.
-
“मी सेटवर जरी अभिनेत्री असले तरी, घरी मी सर्वसाधारण मुलगी असते हे त्यांनी खूप जवळून पाहिलंय. त्यामुळे त्यांनी आधीच ठरवलं होतं की, लग्न करेन तर हिच्याशीच करेन.” असं प्राजक्ताने सांगितलं.
-
दरम्यान, थाटामाटात साखरपुडा पार पडल्यावर प्राजक्ता आणि शंभुराज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम, @gauravkumbharphotography_ | मेकअप आर्टिस्ट : @dhanwademahendra )

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग