-
फिल्ममेकर इम्तियाज अली यांनी मिड डेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोइरालाकडून त्याला मिळालेल्या एका प्रभावी सल्ल्याची आठवण करून दिली. (Photo : Instagram/@imtiazaliofficial)
-
इम्तियाज म्हणाला की “जेव्हा मनिषा कोइराला हिला चित्रपटांमध्ये मोठी संधी मिळत नव्हती, तेव्हा ती रोज ऑडिशन द्यायला जायची आणि घरी यायची. घरी आल्यावर म्हणायची “मी असा विचार करायचे की, जोपर्यंत मी या आयुष्यात आनंदी आहे, तोवर काहीच घडलं नाही तरी, मी ठीक आहे आणि हे परवडतंय आणि हेच पुरेसं आहे.” (Photo : Instagram/@m_koirala)
-
“परंतु, ज्या दिवशी मला असंतुष्ट वाटेल, ज्या दिवशी मला असे वाटेल की काहीतरी घडल्यावरच मी समाधानी होईन, तेव्हा मी नेपाळला परत जाईन,” असं मनिषाने ठरवलं होतं (Photo : Instagram/@m_koirala)
-
“तुम्ही जे जीवन जगत आहात त्यात समाधानी असलं पाहिजे” असंही इम्तियाज म्हणाला. (Photo : Instagram/@imtiazaliofficial)
-
आनंद हा येत-जात राहतो. पण जेव्हा जीवन खूप चांगलं असतं किंवा खूप वाईट असतं, तेव्हा जीवनाला अर्थ असणं हे धरून ठेवायला आधार देतं. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई येथील कन्सल्टंट सायकेट्री डॉ. पार्थ नागदा यांच्या मते, नकारात्मक विचार करण्याची पद्धत बदलायला शिकणं आणि अधिक सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणं यातून माणसाला जीवनात आनंद मिळवता येऊ शकतो. (Photo : Instagram/@m_koirala)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा