-
बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान हिने नुकतंच उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ( Mahakaleshwar) ज्योर्तिंलिंग मंदिरात दर्शन घेतले आहे.
-
महाकालेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) एक ठिकाण आहे.
-
महाकालेश्वर मंदिर उज्जैन (Ujjain) शहरामध्ये क्षीप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे.
-
“जय बाबा महाकाल, ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव”, असे कॅप्शन सोनलने या फोटोंना दिले आहे.
-
यावेळी ती भाविकांबरोबर गर्दीमध्ये प्रार्थना करताना पाहायला मिळाली.
-
यावेळी सोनलने साधा पोशाख परिधान केला होता.
-
सोनलचे २०२४ मध्ये ‘आदिपुरूष’, ‘दर्द’ हे चित्रपट प्रदर्शित झाले.
-
तिने २००८ मध्ये ‘जन्नत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘जन्नत’ चित्रपटातील अभिनयामुळे ती प्रसिद्ध झाली.
-
दरम्यान, सोनलच्या महाकालेश्वर मंदिर दर्शनाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो साभार- सोनल चौहान इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: प्रियदर्शिनी इंदलकर व अभिनय बेर्डेच्या फोटोंची चर्चा; ‘या’ मराठी सिनेमात दिसणार एकत्र

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”