-
आजच्या धावपळीच्या जीवनात, महिलाचं अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दु्र्लक्ष होतं. घरातील आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे स्वतःसाठी वेळ काढणे त्यांना कठीण होते. अशा परिस्थितीत, हलका व्यायाम (Weight Training) हे महिलांसाठी केवळ फिटनेसचे साधन ठरत नाही तर त्यांचे आरोग्य दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. (Photo Source: Pexels)
-
हाडे मजबूत होतील आणि ऑस्टियोपोरोसिसपासून संरक्षण होईल
वय वाढत असताना, महिलांना हाडांचा कमकुवतपणा आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका जास्त असतो. हलक्या वजनाच्या व्यायामामुळे हाडांची ताकद वाढते आणि ती तुटण्यापासून किंवा कमकुवत होण्यापासून रोखता येते. (Photo Source: Pexels) -
स्नायूंची ताकद आणि वयाशी संबंधित कमकुवतपणावर नियंत्रण
४० वर्षांनंतर महिलांच्या स्नायूंची ताकद कमी होऊ लागते. या व्यायामातून त्यांच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि शरीर तंदुरुस्त राहते. हलक्या वजनाचा व्यायाम वयाशी संबंधित कमकुवतपणाला मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित करतो. (Photo Source: Pexels) -
वजन नियंत्रण आणि जलद चयापचय
हलक्या वजनाच्या व्यायामामुळे पचनक्रिया गतिमान होते, ज्यामुळे शरीर अधिक कॅलरीज बर्न करते. वजन कमी करणे आणि लठ्ठपणाच्या नियंत्रणात त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. (Photo Source: Pexels) -
हार्मोन्सचे संतुलन आणि मूड सुधारणे
महिलांना अनेकदा हार्मोन्सच्या असंतुलनाचा त्रास होतो, ज्यामुळे थकवा, चिडचिड आणि मूड स्विंग होतात. हलक्या वजनाच्या व्यायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होते. यामुळे ताण कमी होतो आणि मूड चांगला राहतो. (Photo Source: Pexels) -
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते
वजन उचलण्याचे व्यायाम रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि मधुमेहाचा धोका कमी करतात. ज्या महिला नियमितपणे वजन प्रशिक्षण घेतात त्यांच्यात दीर्घकाळापर्यंत साखरेची पातळी संतुलित राहते. (Photo Source: Pexels) -
आत्मविश्वास आणि मानसिक बळ
व्यायामामुळे केवळ शरीरच नाही तर मनही बळकट होते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि महिला मानसिकदृष्ट्या उत्साही बनतात. (Photo Source: Pexels) -
चांगली झोप आणि आनंदी मन
ज्या महिला दररोज हलके वजन प्रशिक्षण घेतात त्यांना चांगली झोप येते आणि त्यांचे मन अधिक शांत आणि आनंदी असते. (Photo Source: Pexels) -
सोपे वेट ट्रेनिंग व्यायाम
महिला त्यांच्या फिटनेस दिनचर्येत काही सोपे व्यायाम समाविष्ट करू शकतात, जसे की –
स्क्वॅट्स – पाय आणि नितंब मजबूत करण्यासाठी.
लंग्ज – पाय आणि संतुलन सुधारण्यासाठी.
ओव्हरहेड शोल्डर प्रेस – खांदे आणि हात टोन करण्यासाठी
. ग्लूट ब्रिज – कंबर आणि पाठीचा खालचा भाग मजबूत करण्यासाठी
. प्लँक रो – कोर आणि हाताच्या ताकदीसाठी. (Photo Source: Pexels) हेही पाहा- पांढऱ्या केसांची समस्या आहे? ‘या’ ४ आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करुन परत मिळवा तुमचे जाड व चमकदार काळेभोर केस

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा