-
लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सुद्धा मोठ्या उत्साहात आणि जयघोषात बाप्पाचं स्वागत केलं आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अभिनेत्रीच्या घरी यंदा कोणता देखावा असणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती.
-
अभिज्ञाने यापूर्वी स्वामी समर्थ अक्कलकोट मंदिर तसेच गेल्यावर्षी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारला होता. यंदा अभिज्ञा व तिचा पती मेहुल पै यांनी बाप्पाच्या स्वागतासाठी भव्य हनुमान मंदिराचा देखावा साकारला आहे.
-
अभिज्ञाने या देखाव्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बाप्पासाठी अभिज्ञा-मेहुलच्या संपूर्ण घरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.
-
अभिज्ञा कॅप्शनमध्ये लिहिते, “राम दूत अतुलित बल धामा || अंजनी पुत्र पवनसुत नामा || यावर्षी आमच्याकडे विराजमान आहेत… रामभक्त पवन पुत्र हनुमान”
-
अभिज्ञा आणि मेहुल दरवर्षी गणेशोत्सवासाठी घराच्या प्रवेशद्वारापासूनच सजावट करण्यास सुरुवात करतात.
-
प्रवेशद्वाराजवळ लिहिलेला ‘ॐ हं हनुमते नमो नमः’ हा श्लोक सर्वांचं लक्ष वेधून घेतो.
-
प्रवेशद्वाराजवळ ‘जय श्री राम’ लिहून केलेली फुलांची सजावट, संस्कृत श्लोक, बाप्पासाठी खास नैवेद्य या सगळ्याची झलक अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, अभिज्ञाने शेअर केलेल्या बाप्पाच्या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम )

आज गणेश चतुर्थीला ‘या’ ३ राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा! अचानक धनलाभ तर आयुष्यातील अडचणी अखेर होतील दूर