-
सुबोध भावे व तेजश्री प्रधान नुकतेच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘कलाकट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत नवीन मालिका किंवा इतर कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना प्रेक्षकांचे दडपण येते का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. (फोटो सौजन्य: तेजश्री प्रधान)
-
या प्रश्नावर तेजश्री प्रधान म्हणाली, “आपण काम करीत असलेली मालिका गाजावी, अशी इच्छा नक्कीच असते. कारण- प्रेक्षकांना जेव्हा कलाकार आवडायला लागतात, तेव्हा ते त्या कलाकाराकडून अपेक्षा ठेवतात की, हा कलाकार येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी छान असणार, अशी त्यांची अपेक्षा असते. (फोटो सौजन्य: तेजश्री प्रधान)
-
“त्यांचं दडपण तर येतंच. मला वाटतं की, ते दडपण येतंय, तोपर्यंत चांगलं काम करीत राहण्याची धडपड होत राहणार आहे.” (फोटो सौजन्य: तेजश्री प्रधान)
-
या प्रश्नाचे उत्तर देताना सुबोध भावे म्हणाले, “मला दडपण येत नाही. मला कोणाचंच दडपण येत नाही. मला फक्त माझ्या दिग्दर्शकाचं, लेखकाचं आणि निर्मात्याचं दडपण येतं. मी फक्त त्या तिघांना बांधील आहे.” (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)
-
“त्यामुळे त्यांच्या डोळ्यांत मी बघत असतो. जे ठरवून त्यांनी मला घेतलं आहे, ते माझ्याकडून होतंय की नाही? कारण- जी गोष्ट माझ्या हातातच नाही, त्याचं दडपण मी का घेऊ?” (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)
-
सुबोध भावे पुढे म्हणाले, “प्रेक्षकांचा टीआरपी माझ्या हातात नाहीये, थिएटर हाऊसफुल करणं माझ्या हातात नाहीये, जी गोष्ट माझ्या हातात नाही; मी त्याचं दडपण का घेऊ? माझ्या हातात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे काम करणं. तर तेवढंच मी लक्ष देतो. बाकी गोष्टींकडे मी लक्ष देत नाही.” (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)
-
“मी असल्यानंतर ती मालिका नाही चालली, त्याचं दु:ख होतं; पण ती माझी जबाबदारी नाही आणि मालिका चालली, तर मी काही वेगळा अभिनय करायला जात नाही. मी तोच अभिनय करीत असतो. त्यामुळे मालिका चालली, तर आनंदच आहे; पण नाही चालली तर ठीक आहे. (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)
-
“या गोष्टींचा परिणाम माझ्या कामावर व्हायला लागेल ना, ती गोष्ट चुकीची असेल. म्हणजे मालिका चालतेय की नाही, या गोष्टीचा परिणाम माझ्या कामावर व्हायला लागेल याची मला भीती वाटते म्हणून मी ते दडपणच घेत नाही. कारण- माझ्या कामावर या गोष्टींचा मी आजतागायत परिणाम होऊ दिला नाही. (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)
-
“माझ्या कामावर एकाच गोष्टीचा परिणाम होऊ शकतो आणि तो म्हणजे मी स्वत: आहे. बाकी कोणी नाही. त्यामुळे मी माझ्या लेखक, दिग्दर्शक व निर्मात्यांना उत्तरदायी आहे.” (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”