-
बिग बॉस १९, तान्या मित्तल : बिग बॉस १९ मध्ये असलेली तान्या मित्तल पुन्हा एकदा घरातील सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. तिने तिच्या लग्नाच्या योजना सर्वांसमोर जाहीर केल्या आहेत. (Photo: Tanya Mittal Facebook)
-
तान्या मित्तल ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे आणि सध्या तिच्या फॅशन आणि स्टाईल तसेच तिच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत आहे. शोमध्ये आणि बाहेर प्रत्येकजण तिच्याबद्दल बोलत आहे. (Photo: Tanya Mittal Facebook)
-
या चर्चेत आणखी भर घालत, आम्ही सर्वात आधी बातमी दिली होती की बिग बॉस १९ संपल्यानंतर जानेवारीमध्ये तान्या लग्न करणार आहे. (Photo: Tanya Mittal Facebook)
-
आता चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याची आणखी एक झलक पाहायला मिळत आहे कारण तान्याने घरात तिच्या लग्नाबाबत सांगितलं आहे. (Photo: Tanya Mittal Facebook)
-
संभाषणादरम्यान, बसीर अलीने तिला गमतीने विचारले की ती तिच्या लग्नाला तिच्या कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करेल का? (Photo: Tanya Mittal Facebook)
-
यानंतर, तिने सांगितले की ती तिच्या लग्नाला तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आमंत्रित करेल, हे ऐकल्यानंतर सर्वजण तिला चिडवायला लागले. (Photo: Tanya Mittal Facebook)
-
तान्याला दुबईमध्ये एका खाजगी जेटमध्ये लग्न करायचे आहे, ज्यावरुन तिचे सह-स्पर्धक तिला तिच्या पैशांबद्दल आणि राहणीमानावरुन डिवचू लागले आहेत. (Photo: Tanya Mittal Facebook)
-
तथापि, याचा तान्यावर कोणताही परिणाम झाला नाही आणि ती नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने खेळामध्ये खेळत आहे. (Photo: Tanya Mittal Facebook)
-
या आठवड्याच्या शेवटी सलमान खानही तान्याला खूप चिडवताना दिसणार आहे. तान्याने तिच्यासोबत एक बॉडीगार्ड असल्याचे सांगितल्यामुळे तिला चिडवले जात आहे. (Photo: Tanya Mittal Facebook) हेही पाहा- Photos : मोकळे केस, सुंदर नेकलेस अन् जांभळ्या रंगाची साडी; समृद्धी केळकरचा मोहक लूक

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”