-
अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या तिच्या दिवगंत एक्स पतीच्या संपत्तीच्या वादामुळे चर्चेत आहे.
-
करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचं जून २०२५ मध्ये निधन झालं. त्यानंतर संपत्तीबद्दल वाद सुरू झाला आहे.
-
करिश्मा व संजय यांची मुलं कियान व समायरा यांनी संपत्तीतील वाटा मिळावा यासाठी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.
-
कोर्टात मुलाचे प्रतिनिधित्व करिश्मा करतेय, त्यामुळे तिलाही संजय कपूर यांच्या संपत्तीत वाटा हवाय का? अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल करिश्माच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
करिश्मा या खटल्यात तिच्या मुलांचे प्रतिनिधित्व करत आहे. ती पैसे स्वतःसाठी मागत नाहीये, असा युक्तिवाद करिश्माचे वकील महेश जेठमलानी यांनी केला.
-
करिश्मा कपूरला स्वतःसाठी काहीही नकोय. हा खटला तिने मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी भरला आहे. – जेठमलानी
-
कारण संजय कपूर यांनाही मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे होते. – जेठमलानी
-
“संजय कपूर यांच्या मृत्युपत्रात त्यांची भारतातील संपत्ती, परदेशातील संपत्ती, त्यासंदर्भातील सर्व व्यवहारांची माहिती आहे, पण ते मृत्युपत्र अद्याप सर्वांसमोर उघड करण्यात आलेले नाही,” असं जेठमलानी यांनी नमूद केलं.
-
जर संपत्ती ३०,००० कोटी रुपयांची असेल, तर त्यांना फक्त १९०० कोटी रुपये कसे मिळतील… संपत्तीत फक्त पाच जणांचा वाटा आहे. संजय कपूरची आई, त्यांची तीन अपत्ये आणि प्रिया सचदेव,” असं वकील म्हणाले.
-
प्रिया सचदेव संजय कपूर यांचं खरं मृत्यूपत्र का दाखवत नाही? मुलांवर प्रिया सचदेवने दया दाखवायची गरज नाही, कारण ही संजय कपूरची मालमत्ता आहे. कोणीही मुलांवर उपकार करत नाहीये. प्रिया सचदेव तिच्याकडे असलेली उर्वरित २८,००० कोटी रुपयांची मालमत्ता सोडून देणार आहे का? असा सवाल जेठमलानी यांनी केला.

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ