-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
ब्लॅक अँड व्हाईट टोनमध्ये टिपलेले हे फोटो तिच्या सौंदर्याला एक वेगळाच नवा आयाम देतात.
-
पांढऱ्या ड्रेसमध्ये सजलेली सई अतिशय साधी, पण तितकीच एलिगंट आणि स्टायलिश दिसत आहे. ड्रेसवरील फ्लॉवर पॅटर्न तिच्या व्यक्तिमत्त्वाला नाजूक सौंदर्याची झळाळी देतो.
-
एका विंटेज टेलिव्हिजनच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या छायाचित्रांना वेगळाच कलात्मक टच मिळाला आहे, त्यामुळे फोटोशूटला रेट्रो आणि क्लासिक लूक प्राप्त झाला आहे.
-
सई ताम्हणकरने या फोटोशूटसाठी निवडलेला मिनिमल मेकअप आणि साधी हेअरस्टाईल तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधोरेखित करते. साधेपणातही आकर्षक भासणारा तिचा हा लूक चाहत्यांना भावतो आहे.
-
पांढऱ्या ड्रेसमुळे सईच्या ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित करणारा हा फोटोशूट सध्या चर्चेत आला आहे.
-
सोशल मीडियावर सईचे हे फोटो फॅशन आणि स्टाईलप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. Gemini पेक्षाही सुंदर अश्या कमेंट चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सई ताम्हणकर/ इंस्टाग्राम)

आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्या राशींच्या कानी पडणार शुभवार्ता? वाचा मेष ते मीनचे सोमवार विशेष राशिभविष्य