-    झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’मध्ये झळकणाऱ्या अभिनेत्री संजना काळे हिने अलीकडेच सोशल मीडियावर एक नवा फोटो शेअर केला आहे. त्याद्वारे तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 
-    गुलाबी रंगाची पारंपरिक साडी, फुलांचे आकर्षक डिझाईन आणि त्यासोबतचा हिरवा डिझायनर ब्लाऊज अशा उठावदार पोशाखात संजना दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूपच भावतो आहे. 
-    साडीचा पारंपरिक पल्लू आणि जुळवून घेतलेली पोज फोटोला एक वेगळा मोहकपणा देतात. 
-    केसांमध्ये माळलेला पांढऱ्या फुलांचा गजरा तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला पारंपरिक टच देतो. हा लूक पाहून अनेकांनी तिला अगदी सणासुदीच्या तयारीतली नवरी म्हणूनही गौरवले आहे. 
-    पाठमोरी अदा दाखवीत संजनाने दिलेली पोज फोटोला अधिकच कलात्मक बनवते. साधेपणातली ही सुंदरता तिच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेशी आहे. 
-    पार्श्वभूमीला निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार झाडे व ढगाळ आकाश दिसत असल्याने फोटोचा सौंदर्यदृष्टीने परिणाम अधिकच खुलून दिसतो. 
-    सोशल मीडियावर संजनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. 
-    ‘पारू’ मालिकेतल्या भूमिकेमुळे संजना घराघरात पोहोचली आहे. मालिकेत साधेपणाने झळकणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र नेहमीच वेगवेगळ्या फॅशन स्टाइल्स सादर करते. 
-    (सर्व फोटो सौजन्य : संजना काळे/इन्स्टाग्राम) 
 
  कोणत्या राशींना नवीन कामाची सुरवात करण्यास उत्तम ठरेल दिवस? वाचा मेष ते मीनचे मंगळवारचे राशिभविष्य 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  