-
मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिचा नवा पारंपरिक लूक सोशल मीडियावर झळकला असून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
-
गुलाबी पैठणी साडी, सोन्याचे जडजवाहीर दागदागिने आणि कपाळावरची आकर्षक बिंदी यामुळे जान्हवीने मराठमोळ्या रुपाची झलक साकारली आहे. तिच्या या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्याची छटा उठून दिसत आहे.
-
गळ्यातील सोन्याचा चोकर सेट, कानातील झुमके आणि नथ या दागिन्यांनी तिचा लूक अधिकच मोहक झाला आहे. परंपरा आणि ग्लॅमर यांचा सुंदर संगम तिच्या रुपातून जाणवतो.
-
केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर खुलणारे स्मितहास्य आणि आत्मविश्वासाने भरलेली देहबोली यामुळे ती या फोटोशूटमध्ये अधिकच उठून दिसते.
-
‘मराठी मुली असतातच सुंदर….any doubt???’ अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
-
जान्हवीचा हा पारंपरिक आविष्कार अनेकांना सण-उत्सवाच्या आठवणी जागृत करून देतो. खासकरून लग्नसराईत किंवा सांस्कृतिक समारंभात दिसणाऱ्या मराठमोळ्या वेशभूषेची झलक तिच्या पोशाखात दिसते.
-
गुलाबी रंगाच्या पैठणीवरील सोनेरी काम, त्यावरची कलाकुसर आणि गडद बॉर्डर यामुळे तिच्या साडीचे सौंदर्य दुपटीने खुलले आहे. पारंपरिक साडीचे सौंदर्य तिने आत्मविश्वासाने मिरवले आहे.
-
अभिनेत्री जान्हवी नेहमीच तिच्या वेगळ्या आणि आकर्षक स्टाईलमुळे चर्चेत राहते. या वेळेस मात्र तिच्या या पारंपरिक आविष्काराने चाहत्यांचे डोळे दिपवले आहेत
-
( सर्व फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर/इनस्टाग्राम)

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेमुळे दादरमध्ये तणाव; खासदार देसाई म्हणाले, “त्या भेकडांना…”