-
मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांचा ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Goshta Movie) हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटाच्या पुण्यातील प्रीमियरसाठी (Pune Movie Premier) निवेदिता यांनी खास लूक केला होता.
-
निवेदिता यांनी निळ्या व पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस (Blue And White Dress Look) परिधान केला होता.
-
अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने (Kashmira Kulkarni) निवेदिता यांच्या फोटोंवर ‘The Best Look Tai’ अशी कमेंट केली आहे.
-
आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात नव्या पिढीचा प्रेमाकडे, नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा दिसतो, तितकाच आधीच्या पिढीच्या प्रगल्भ होत गेलेल्या प्रेमाची गोष्टही पाहायला मिळते.
-
निवेदिता यांच्याबरोबर या चित्रपटात अभिनेत्री प्रिया बापट, उमेश कामत, गिरीश ओक, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
‘बिन लग्नाची गोष्ट’ या शीर्षकावरूनच ही प्रेमकथा लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावर बोट ठेवणारी आहे हे स्पष्ट होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : निवेदिता सराफ/इन्स्टाग्राम)

“भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा”, ‘खजुराहो’बाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; सरन्यायाधीश म्हणाले, “तुम्ही भक्त…”