-
नवरात्रीच्या निमित्ताने अभिनेत्री रूपाली भोसलेने खास पारंपरिक अंदाजात फोटो शेअर केले आहेत.
-
पिवळ्या रंगाची नऊवारी साडी आणि हिरवा शेला परिधान करून रूपालीने नवरात्रीचा उत्साह अधिक खुलवला आहे.
-
गळ्यातील जड दागिने, नथ व बांगड्यांनी तिचा नवरात्रीतील लूक अधिक आकर्षक दिसत आहे.
-
केसांचा सुंदर अंबाडा आणि हलक्या मेकअपने रूपालीने आपला पारंपरिक अंदाज साधेपणातही उठावदार केला आहे.
-
रूपालीचा हा लूक देवीच्या वेशभूषेची आठवण करून देतो.
-
नवरात्रीत प्रत्येक जणीला फॅशनचा वेगळा अंदाज आजमावण्याची प्रेरणा या फोटोमधून मिळते.
-
पारंपरिक गजरा आणि सोन्याच्या दागिन्यांनी तिने साजरे केलेले रूप उत्सवाला ‘चार चाँद’ लावते.
-
या लूकमध्ये रूपालीने महाराष्ट्राची परंपरा, नऊवारी साडीतील ऐश्वर्य आणि नवरात्रीचा उत्साह एकाच वेळी खुलवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य रूपाली भोसले/ इंस्टाग्राम)

सर्वपित्री अमावस्येला ग्रहांची स्थिती कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक? वाचा मेष ते मीनचे रविवार विशेष राशिभविष्य