-
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा शुभ रंग पांढरा असून, अभिनेत्री विद्या बालनने पारंपरिक पांढऱ्या साडीत आपला लूक सादर केला आहे.
-
सोन्याच्या काठाची पांढरी साडी आणि आकर्षक दागिने यांतून विद्याने आपला लूक अधिक देखणा केला आहे.
-
नवरात्रीची सुरुवात पारंपरिकतेने करीत विद्याने खास फोटोशूट केले आहे.
-
गळ्यात दागिने न घालता, फक्त कानातील मोठ्या झुमक्यांनी तिने साधेपणा आणि देखणेपणा दाखवला आहे.
-
केसांचा बो, कपाळावर लाल कुंकवाचे ठिपके आणि हलका मेकअप तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देतो.
-
विद्याने या फोटोसोबत Happy Navratri अशी शुभेच्छा देत नवरात्रीची सुरुवात साजरी केली आहे.
-
साडीमधील तिचा लूक नेहमीच खास राहिला आहे. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
-
पांढऱ्या रंगाच्या सौंदर्यात विद्याने केलेला हा साजिरा लूक नवरात्रीची शुभ सुरुवात म्हणून उठून दिसतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : विद्या बालन/इन्स्टाग्राम)

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”