-
मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर दांपत्य यश मताधिकारी आणि शिवानी मंचेकर म्हणजे ‘vibe with yashi’ यांना ‘Couple Content Creator of the Year’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
-
“We did it!” अशा आनंदभरल्या शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
-
या खास प्रसंगी शिवानीनं सोनेरी छटा असलेली साडी व ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
गळ्यातील आकर्षक नेकलेस आणि हातातल्या हिरव्या बांगड्या तिच्या लूकला उठाव देत आहेत.
-
यशनं ऑफ-व्हाइट रंगाचा स्टायलिश कोट-पॅन्ट आणि डार्क शर्ट घालून आपला लूक साधा, पण देखणा बनवला आहे.
-
दोघांच्या स्मितामुळे फोटो अधिकच खास आणि छान वाटत आहेत.
-
हातात ट्रॉफी घेतलेल्या फोटोमध्ये शिवानी आणि यश दोघेही अत्यानंदानं हा क्षण साजरा करताना दिसत आहेत.
-
त्यांच्या या सन्मानामुळे मराठी इन्फ्लुएन्सर विश्वात त्यांचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे.
-
पुरस्कार सोहळ्यात दोघांनी मिळून दिलेला हा परफेक्ट कपल गोल्सचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर