-
नवरात्रीच्या उत्सवी वातावरणात मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हिचा नवा लूक सोशल मीडियावर झळकला आहे.
-
गिरिजाने लाल रंगाची कॉटन कोटा साडी परिधान करून पारंपरिकतेला उजाळा दिला.
-
लाल रंग नवरात्रीत शक्ती, सामर्थ्य व मंगलतेचं प्रतीक मानला जातो. त्याच रंगात गिरिजा खुलून दिसत आहे.
-
ही साडी तिनं खास कोटा शहरातून खरेदी केली असल्याचं कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे.
-
साधेपणातही उठावदार दिसणाऱ्या या रेड लूकवर चाहत्यांकडून ‘फेस्टिव्ह परफेक्ट’ अशा प्रतिक्रिया येत आहेत.
-
नवरात्रीत प्रत्येक दिवसाला वेगळ्या रंगाचे महत्त्व असते. लाल रंगाच्या दिवशी गिरिजाने या साडीची निवड करून सणाचा उत्साह वाढवला.
-
तिचा पारंपरिक पोशाख, मोकळे केस व हलके स्मित या सर्वांमुळे गिरिजाचा लूक अधिकच मोहक वाटतो.
-
गिरिजाचा हा रेड लूक नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शक्ती आणि सौंदर्य यांचा संगम दर्शवतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरिजा ओक गोडबोले/इन्स्टाग्राम)
“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान