-
प्रियदर्शिनी इंदलकरने तिचे नवे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
-
प्रिया सध्या ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरामध्ये पोहोचली आहे. तिथले हे फोटो आहेत.
-
यावेळी प्रियाने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर तिने खास ओढणी पेअर केली आहे, जी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
ओढणीचा उल्लेखही तिने कॅप्शनमध्ये केला आहे. तिने लिहिलंय की, ‘वंदु in Sidney! Playing with this beautiful Odhani by @saaj_kalecha in Australian air!’
-
दरम्यान, प्रियदर्शिनीचा ‘दशावतार’ हा सिनेमा सध्या सर्वत्र गाजत आहे. त्याच निमित्ताने तिचा परदेश दौरा सुरु आहे.
-
या चित्रपटामध्ये प्रियाने ‘वंदना’ हे पात्र साकारले आहे. या चित्रपटातील अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची खूप चर्चा आहे.
-
दरम्यान, ,सध्या प्रियाच्या या फोटोशूटने चाहते सुखावले आहेत. त्यांना वंदूचा हा लूक फारच आवडलाय व त्यावर ते विविध कमेंट्स करत आहेत.
-
तर प्रियाही या ओढणीबरोबर ऑस्ट्रेलियातल्या हवेत मनमुरादपणे खेळली आहे. (सर्व फोटो साभार- प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos: चंद्रकोर, नथ, हिरवा चुडा अन्…; रेश्मा शिंदेचा केसरी साडीमधला देखणा लूक

Ind Vs Pak Asia Cup : “तुमच्या रक्तात एवढी देशभक्ती असती तर…”, संजय राऊत टीम इंडियावर भडकले, नक्वींबरोबरचा ‘तो’ Video केला शेअर