-
Sarang Sathaye Dev Paula Wedding Love Story: ‘भाडिपा’ (Bharatiya Digital Party) फेम मराठी अभिनेता सारंग साठ्येने २८ सप्टेंबर रोजी पॉलाबरोबर लग्नगाठ बांधील.
-
‘Yes We Got Married!’ असे कॅप्शन देत सारंगने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
सारंग व पॉलाच्या लग्नातील फोटोंवर अनेक कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
‘टोरोंटो फिल्म फेस्टिव्हल’ला एका पार्टीमध्ये सारंग पॉलाला भेटला होता.
-
सारंग आणि अनुषा एका कार्यक्रम करत असताना कॅनडाहून एक मुलगी येणार असल्याचे समजले. तिला भेटल्यावर कुठेतरी आधी पाहिल्याचे सारंगला आठवत होते.
-
पॉलाला मात्र टोरोंटोला भेटल्याचे नीट आठवत होते. सारंग आणि पॉलाच्या बोलण्याची सुरुवातच मजेदार झाली.
-
मित्रांनी त्याला कॅनडाहून सारंगची फॅन आली आहे, अशी चिडवाचिडवी सुरू केली. तिला मराठी समजत नसल्याने सारंगला पॉलाशी संवाद साधण्यास अडचण व्हायची.
-
दोन दिवस बोलत नाही म्हटल्यावर पॉलाने सारंगची मस्करी केली. पहिल्याच भेटीत सारंगला ती आवडली होती.
-
पॉलाशी बोलताना मराठीतून फ्लर्ट केलेलं अजून मला आठवतं, असं सारंग सांगतो.
-
पॉलाचे विचार, स्वभाव, काम करण्याची पद्धत हळूहळू सारंगला आवडायला लागली.
-
एकाच महिन्यात सारंग आणि पॉलाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. हे दोघे आणि अनुषा पुण्यात घर घेऊन राहायला लागले.
-
याआधी घरी आई वडिलांना सारंगने त्याच्या नात्याविषयी सांगितले.
-
भाडिपा (भारतीय डिजीटल पार्टी) हे तिचे बाळ आहे. कारण हे सुरू करण्याची संकल्पना तिची होती. आज भाडिपाला नऊ वर्षे झाली असून पॉला आणि सारंगचे नाते १२ वर्षांचे झाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारंग साठ्ये/इन्स्टाग्राम)

डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी; म्हणाले, “जोहरान ममदानी जर न्यूयॉर्कचे महापौर झाले तर…”