-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे (Priya Marathe) ३१ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.
-
प्रियाच्या अकाली निधनाने कलाकारांसह चाहत्यांना ही धक्का बसला आहे.
-
प्रियाने ‘चार दिवस सासूचे’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘पवित्र रिश्ता’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
-
प्रत्येक सादरीकरणातून प्रियाने प्रेक्षकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला होता.
-
प्रियाचा पती अभिनेता शंतनू मोघेने (Shantanu Moghe) आज इन्स्टाग्रामवर तिच्याबरोबरचे काही कँडिड फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रिया व शंतनू विमान प्रवास करत फोटोंसाठी कँडिड पोज देत आहेत.
-
शंतनूने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी म्हणाले, “तू जोडीदार कसा असावा याचा धडा घालून दिला आहेस…यापुढे तरी तुझ्या वाटेत काटे न पसरण्याची जबाबदारी देवाने घ्यावी हीच प्रार्थना…”
-
(सर्व फोटो सौजन्य : शंतनू मोघे/इन्स्टाग्राम)

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…