-
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीने पारंपरिक साडीत आपला लूक साकारला असून, तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे
-
नवरात्रीत देवीची उपासना आणि स्त्रीशक्तीची पूजा केली जाते. हाच उत्सव प्राजक्ता माळीने तिच्या जांभळ्या पैठणीच्या मोहक अवतारातून साजरा केला आहे.
-
चांदीच्या जरीने सजलेली ही साडी पारंपरिक सौंदर्याची झलक दाखवते.
-
प्राजक्ताने साध्या गोल्डन ब्लाऊजची निवड केली असून, त्याच्या आकर्षक कटमुळे संपूर्ण लूक अधिक देखणा दिसतो.
-
प्राजक्ताच्या या फोटोमध्ये दागिन्यांचा उठावदार वापर दिसून येतो. गळ्यातील हार, मोठे झुमके व अंगठ्या तिच्या लूकला शोभा देतात.
-
भारदस्त लूक यावा म्हणून तिने निवडलेले दागिने जरीच्या डिझाईनशी उत्तम प्रकारे जुळतात. या जड दागिन्यांमुळे तिचा लूक एकदम राजेशाही भासतो.
-
केसांचा साधा अंबाडा, कपाळावरची छोटी काळी टिकली आणि हलका मेकअप पारंपरिक आणि दिव्य सौंदर्याला अधोरेखित करतो.
-
प्राजक्ता माळीने फोटोसोबत ‘रंग जांभळा’ असे म्हटले आहे. नवरात्रीतील नऊ रंगांपैकी या एका रंगाने तिच्या वस्त्रप्रावरणांशी अप्रतिम सुसंगती साधली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS