-
खासदार नरेश म्हस्के यांचे चिरंजीव आशुतोष यांचा साखरपुडा समारंभ नुकताच हर्षाली हिच्याशी मोठ्या थाटात संपन्न झाला.
-
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी या मंगलमय प्रसंगी खास उपस्थिती लावली.
-
या प्रसंगी दीपाली सय्यद यांनी नववधू-वरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले.
-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे हे देखील या समारंभात खास उपस्थित होते.
-
दीपाली सय्यद यांनी या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘उत्कृष्ट संसदपटू सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब व सौभाग्यवती माधवी नरेशजी म्हस्के यांचे सुपुत्र चि. आशुतोष यांचा साखरपुडा सोहळा हर्षदा हिच्याशी संपन्न झाला. याप्रसंगी या वधू-वरांना आशीर्वाद दिले. त्यावेळी माझे सहकारी मित्र अभिनेते सुबोध भावे हे देखील उपस्थित होते’ अशी कॅप्शन दीपाली सय्यद यांनी फोटोंना दिली आहे.
-
खासदारपुत्राच्या या सोहळ्यात राजकारण आणि कला क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती पाहायला मिळाली.
-
खासदार म्हस्के यांच्या कुटुंबीयांनी हा साखरपुडा सोहळा अत्यंत उत्कृष्ट आणि दिमाखदार पद्धतीने आयोजित केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपाली सय्य/इन्स्टाग्राम)
पार्थ पवारांच्या कंपनीचं गौडबंगाल ! चार वर्षांत कमावलेलं उत्पन्न अखेर आलं समोर