-
अभिनेत्री क्रांती रेडकरने नुकताच आपल्या पती समीर वानखेडेसह एक सुंदर फोटो शेअर करीत पारंपरिक लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
रेशमी साडीत खुलून दिसणारी क्रांती रेडकर तिच्या मराठमोळ्या आणि एलिगंट अंदाजामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
‘Saree is one garment that doesn’t require a fit check,’ अशी कॅप्शन देत क्रांतीनं या पोस्टमधून साडीच्या सौंदर्याबद्दलचा आपला प्रेमभाव व्यक्त केला.
-
या फोटोमध्ये समीर वानखेडे साध्या, पण आकर्षक अंदाजात दिसत असून, दोघांची जोडी एकदम परफेक्ट वाटते.
-
क्रांतीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून, अनेकांनी ‘परफेक्ट कपल’ अशी कमेंट केली आहे.
-
पारंपरिक दागिने, सुंदर मेकअप व साधी हेअरस्टाईल या सगळ्यामुळे क्रांतीचा साडीतील लूक अधिकच खुलून दिसतो आहे.
-
क्रांती रेडकरने शेअर केलेल्या या फोटोंना काही तासांतच हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत.
-
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांची ही जोडी कायमच चर्चेत राहते आणि या नव्या फोटोने त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आनंद दिला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : क्रांती रेडकर/इन्स्टाग्राम)
शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा! १७ दिवसानंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार; मिळेल भरपूर पैसा अन् सुख…