-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ या मालिकेतील भूमिकेमुळे ओळख मिळवलेल्या अभिनेत्री पायल जाधवचा ९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने तिच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ.
-
अबीर गुलाल, परीस, गोलमाल या मालिकेतून आपल्या अभिनयाने पायल जाधवने मराठी रसिकांची मने जिंकली. त्यानंतर तिने विविध चित्रपट आणि वेबसीरीजमध्येही पदार्पण केले.
-
२०२३ साली आलेल्या बापल्योक या पहिल्याच चित्रपटात पायलने केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले.
-
२०२३ साली आलेल्या या चित्रपटात नागराज मंजुळे यांनी पायलला संधी दिली. दिग्दर्शक मकरंद माने यांनी टाकलेला विश्वास पायलने सार्थ करून दाखवला.
-
मानवत मर्डर्स या सोनी लिव्हवरील वेबसीरीजमध्येही पायल जाधवने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर अशा मोठ्या कलाकारांसमोर काम करताना तिच्यावर कोणतेही दडपण दिसले नाही.
-
‘बिग बॉस मराठी ५’ व्या पर्वात विजयी ठरलेल्या सूरज चव्हाणच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘झापुक झुपूक’ या सिनेमातही पायल जाधवने काम केले होते.
-
अभिनेत्री पायल जाधवने ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सुरजच्या बहिणीची भूमिका साकारली होती. सूरज चव्हाणच्या बहिणीचं पात्र साकारताना मनापासून आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.
-
पायल जाधवचे वडील पुण्यातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. याच शाळेत शिक्षण घेऊन पायलने नंतर पुणे विद्यापीठातून मास्टर इन हेल्थ सायन्समधून पदवी घेतली. तसेच ललित केंद्रातून भरतनाट्यमध्येही पदवी मिळवली.
-
अभिनय, भरतनाट्य याबरोबरच पायल जाधवमध्ये इतरही कला आहेत. शिवजयंतीनिमित्त पायलने लाठीकाठी आणि तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखविणारा व्हिडीओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला.
पैसा.. मोठी नोकरी.. फ्लॅट…२०२६ वर्ष ‘या’ ३ राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात; ३० वर्षांनंतर शनि-बुधाच्या दुर्मीळ युतीनं नशिब पालटणार