-
वाराणसी शहराला बनारस किंवा काशी म्हणून देखील ओळखलं जातं. याठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात देवदिवाळी साजरी केली जाते.
-
देवदिवाळी सुरू झाल्यावर बनारसमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी होते. अनेक सेलिब्रिटी सुद्धा या दिवसांत बनारसला भेट देतात.
-
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिशा परदेशी सुद्धा नुकतीच बनारसला पोहोचली आहे.
-
दिशाने बनारस येथील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
बनारसला गेल्यावर रामघाट, नमो घाट, अस्सी घाट, दशाश्वमेध घाट अशा विविध ठिकाणी भेट देऊन पर्यटकांना देवदिवाळीचा आनंद घेता येतो.
-
याशिवाय बनारसला गेल्यावर पर्यटक आवर्जून बोटिंग करतात. दिशाने सुद्धा गंगा नदीत बोटिंग करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
गंगा आरती, लेझर शो, गंगाकिनारी फटाक्यांची आतषबाजी याची झलक दिशाच्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.
-
दिशाने वाराणसीसह अयोध्येतील राम मंदिराला सुद्धा भेट दिली आहे.
-
दरम्यान, दिशाने शेअर केलेल्या या सुंदर फोटोंवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तुझ्यामुळे आम्हाला वाराणसीचं दर्शन झालं अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिशाच्या फोटोंवर दिल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : दिशा परदेशी इन्स्टाग्राम )
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी