-
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांना ओळखलं जातं. या दोघांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. ‘देवयानी’ या मालिकेमुळे संग्राम घराघरांत पोहोचला. नुकतीच ही लोकप्रिय जोडी कोल्हापुरला गेली होती.
-
संग्राम साळवीचं गाव कोल्हापूर येथे आहे. संग्राम व खुशबू त्यांच्या दोन्ही मुलांसह नुकतेच कोल्हापुरला गेले होते. यावेळी अभिनेत्रीने युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून अभिनेत्याच्या संपूर्ण घराची झलक चाहत्यांना दाखवली.
-
संग्राम साळवीचं गावचं घर खूपच सुंदर आहे. गावातील वातावरण, मोकळी जागा पाहून अभिनेत्याचा मुलगा राघव खूपच आनंदी झाला होता.
-
अभिनेत्याच्या घराजवळ अगदी बाजूलाच गुरांचा गोठा देखील आहे.
-
संग्राम व खुशबू या दोघांसाठी कुटुंबीयांनी खास कोल्हापुरी मिसळचा बेत केला होता.
-
दत्त मंदिर, महालक्ष्मी मंदिरात जाऊन या दोघांनी देवदर्शन सुद्धा केलं. यावेळी माझं माहेर कोकणात आणि सासर कोल्हापुरात आहे त्यामुळे मी खूपच लकी आहे अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.
-
अभिनेत्याच्या घरात एन्ट्री घेतल्यावर समोरच त्याचा एक मोठा फोटो लावण्यात आला आहे.
-
गावचे सगळे लोक संग्रामवर भरभरून प्रेम करतात. तो गावी गेल्यावर आवर्जून त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात. संग्राम सुद्धा आवडीने सर्वांना भेटतो, त्यांचे आशीर्वाद घेतो असं अभिनेत्रीने यावेळी सांगितलं.
-
दरम्यान, संग्राम साळवीचं कोल्हापूरचं घर चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. संग्राम व खुशबू दोघंही नावाजलेले कलाकार असूनही कायम सर्वांशी हसुन-खेळून वागतात. त्यांचे व्हिडीओ आपलेसे वाटतात अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर दिल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : अभिनेत्री खुशबू तावडे युट्यूब चॅनेल )
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने पोस्ट करून दिली माहिती