-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली विनोदी अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर.
-
आपल्या मनमोहक हास्याने आणि विनोदांच्या अनोख्या बाजाने रसिकाने प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे.
-
आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी रसिका सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रीय असते.
-
अशातच रसिकाने तिच्या हिमाचल प्रदेशातील खास सफरीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
कामातून ब्रेक घेत रसिका हिमाचल प्रदेशात फिरायला गेली होती आणि या ठिकाणी विविध स्थळांना तिने भेटी दिल्या.
-
रसिकाने सूरज ताल तलाव, बारा-लाचा ला पास आणि लाहौल Spiti Valley या ठिकाणी भेटी दिल्या. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
-
रसिकाने शेअर केलेल्या या फोटोमधून ती चहूबाजूला पसरलेल्या बर्फात आनंदाने एन्जॉय करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, रसिकाने शेअर केलेल्या या खास फोटोला चाहत्यांनी आणि कलाकारांनी लाईक्स-कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, आजवर अनेक विनोदी प्रहसनांमधून रसिकाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं आहे. तिचे अनेक स्किट्स गाजले आहेत.
आजपासून अचानक धनलाभ होणार, बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार; ‘या’ तीन राशींच्या घरी लक्ष्मी वास करणार