-
आपल्या विनोदी स्वभावानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ‘लाफ्टरक्वीन’ भारती सिंग.
-
भारतीनं काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई होणार असल्याची खुशखबर शेअर केली. ४१व्या वर्षी भारती सिंग आई होणार आहे.
-
सोशल मीडियावर नवरा हर्ष लिंबाचियाबरोबरचा एक फोटो पोस्ट करत भारतीनं दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती.
-
अशातच भारतीच्या खास मैत्रिणींनी तिचं बेबी शॉवर केलं आणि याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
Laughter Chef 3 च्या सेटवर जन्नत जुबेर, तेजस्वी प्रकाश आणि जॅस्मिन यांनी भारतीचं बेबी शॉवर केलं. जन्नतने तिच्या इन्स्टाग्रामवर याचे फोटो शेअर केले आहेत.
-
Team Baby Girl असं कॅप्शन देत जन्नतने भारतीच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. या बेबी शॉवरच्या पार्टीत जन्नत जुबेर, तेजस्वी प्रकाश आणि जॅस्मिनसह अली गोनी आणि करिश्मा शाहदेखील उपस्थित होते.
-
लग्नानंतर आठ वर्षांनी भारती आणि हर्ष लिंबाचिया दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत. भारती व हर्ष यांना एक मुलगा आहे आणि आता ते दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. (सर्व फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इन्टाग्राम)
-
भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ साली लग्न केलं होतं. त्यानंतर ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांना पहिला मुलगा झाला झाला. मुलाचं नाव लक्ष्य असून तो साडेतीन वर्षांचा आहे आणि आता भारती पुन्हा आई होणार आहे.
Uddhav Thackeray : “हेच NDA च्या बहुमताचं गणित”, बिहार निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य