-
‘झपाटलेला’, ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’सारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे.
-
लक्ष्मीकांत बेर्डेंचे अनेक सिनेमे गेल्या दोन पिढ्या एन्जॉय करत आहेत. आजही चाहते मंडळी त्यांचे गाजलेले सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी करतात.
-
अशातच एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा म्हणजेच अभिनय बेर्डेनंही वडिलांचे सिनेमे रि-रिलीज करण्याची इच्छा व्यक्त केली.
-
लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत अभिनयला ‘तुला त्यांचा कोणता सिनेमा रिमेक व्हावा असं वाटतं’, असा प्रश्न विचारण्यात आला.
-
यावेळी अभिनय म्हणाला, “रिमेकपेक्षा रि-रिलीज व्हावेत. ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘एक डाव भुताचा’ आणि असे अनेक सिनेमे आहेत. जे पुन्हा रिलीज व्हावेत.”
-
यावेळी अभिनय म्हणाला, “रिमेकपेक्षा रि-रिलीज व्हावेत. ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘एक डाव भुताचा’ आणि असे अनेक सिनेमे आहेत. जे पुन्हा रिलीज व्हावेत.”
-
“अनेक कल्ट सिनेमे ज्या लोकांनी बनवले, विशेषत: ते सिनेमे ज्या लेखकांनी लिहिले, ते आता आपल्यात नाहीत. त्यामुळे ते परत होऊ शकत नाही.”
-
“रिमेक किंवा सीक्वल मूळ लेखकाशिवाय करू नये असं मला वाटतं. रिमेक त्यातली गंमत जाईल आणि निरागसपणाही राहणार नाही.” (फोटो सौजन्य : अभिनय आणि स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय बेर्डेही या क्षेत्रात आला आहे. त्याचा ‘दशावतार’ सिनेमा गाजला. आता तो ‘उत्तर’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“पुरुषही रडतात, पण….” बोरीवली स्टेशनवरील हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ चर्चेत