-
३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त मुंबई पुण्यासह जगभरात अनेक ठिकाणी बाप्पा विराजमान झाले. (फोटो: संग्रहित)
-
दीड दिवसाचा पाहुणचार घेऊन आता अनेक ठिकाणी बाप्पा परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.(फोटो: संग्रहित)
-
गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेसह गणेश विसर्जनाच्यावेळी सुद्धा विधिवत पूजा करणे गरजेचे आहे. याच पूजा विधी व विसर्जनाच्या वेळी उच्चारायचा मंत्र जाणून घ्या. (फोटो: संग्रहित)
-
गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. गणपतीला आवडीचा मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा. (फोटो: अमित चक्रवर्ती)
-
एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि नाणी घेऊन एका कापडात गुंडाळून मूर्तीजवळ ठेवावी. (फोटो: संग्रहित)
-
गणेश विसर्जनाच्याआधी कुटुंबासमवेत आरती करून बाप्पाचा जयजयकार करावा. (फोटो: अमित चक्रवर्ती)
-
गणपती विसर्जनवेळी मंत्र उच्चारल्याने प्राणप्रतिष्ठेला जे देवत्व मूर्तीत येते ते पुन्हा काढून घेतले जाते. त्यानंतर आपण गणेशाच्या केवळ मूर्तीचे विसर्जन करता. (फोटो: संग्रहित)
-
गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात व मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात (फोटो: संग्रहित)
