-
आज सर्वत्र गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पाचं आगमन ढोल ताशांच्या गजरात भाविक करत आहे. सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. (Express Photo)
-
दरम्यान, आज आपण लाडक्या गणरायावर आधारीत मालिका व त्यातील कलाकारांबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी पडद्यावर गणरायाची भूमिका साकारली आहे. (Photo: Social Media)
-
आकाश नायर
‘गणेश लीला’ या लोकप्रिय मालिकेमध्ये आकाश नायरने बाल गणेशाची भूमिका साकारली होती. (Photo: Social Media) -
स्वराज येलवे
‘गणपती बाप्पा’ या प्रसिद्ध मालिकेमध्ये स्वराजने बाल गणेशाची भूमिका साकारुन सर्वांचं मनोरंजन केलं होतं. (Photo: Social Media) -
अल्पेश ढाकण
‘देवों के देव महादेव’ या मालिकेने अभिनेता मोहित रैनाला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याच मालिकेत गणपतीची सुंदर अशी भूमिका साकारून अल्पेश ढाकणने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. (Photo: Social Media) -
उझैर बसर
‘विग्घहर्ता गणेश’ ही मालिका मालिकाविश्वातील सर्वात लोकप्रिय पौराणिक मालिका ठरली होती. या मालिकेमध्ये गणरायाची भूमिका साकारणारा अभिनेता उझैर बसर होता. (Photo: Social Media) -
जगेश मुकाटी
जगेश मुकाटी हे चित्रपटसृष्टीमधले एक दिग्गज अभिनेता होते. त्यांनीही गणपतीची भूमिका साकरली होती. २०२० मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. (Photo: Social Media) -
अद्वैत कुलकर्णी
अद्वैत कुलकर्णी हा गणपतीची भूमिका साकारणारा सर्वात लहान वयाचा कलाकार ठरला होता. त्यानं ‘जय देवा श्री गणेशा’ या मालिकेमध्ये बालगणेशाची भूमिका साकरली होती. (Photo: Social Media) -
शनय भिसे
प्रचंड लोकप्रिय ठरलेली मराठी मालिका ‘जय मल्हार’मध्ये शनय भिसे या कलाकाराने गणपती बाप्पाची भूमिका साकारली होती. अभिनेता देवदत्त नागेने या मालिकेत खंडोबाची मुख्य भूमिका साकारली होती. (Photo: Social Media) हेही पाहा- सहारा ते ड्रीम ११; भारतीय क्रिकेट संघाची जर्सी दुर्दैवी आहे का? प्रायोजकांना आल्या आर्थिक अडचणी, स्पॉन्सरशिपचा इतिहास काय?

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार