-
आज सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह शिगेला गेलेला पाहायला मिळाला.
-
पुण्यातही गणेश भक्तांनी गणरायाचं वाजत गाजत स्वागत केलं.
-
पुण्यातील मानाच्या गणपतींचं स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
-
यावेळी विविध मंडळांच्या पथकांनी रस्त्यावर उतरून गणरायाच्या आगमनाचा जंगी जल्लोष केला.
-
यावेळी मिरवणूकीत भारतानं पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या धडाकेबाज योद्ध्यांचा देखावाही पाहायला मिळाला.
-
तर ढोलपथकांमध्ये महिलांचाही मोठा सहभाग दिसला.
-
पारंपरिक पेहेरावात त्यांनी बाप्पाच्या स्वागतासाठी मनभावे ढोलवादन केलं.
-
यावेळी पुण्यातील प्रमुख रस्ते भक्तांच्या गर्दीने तुडुंब भरुन गेले होते.
-
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सर्वत्र घुमत होता.
-
लक्ष्मी रोड , बाजीराव रोडवरील ही दृश्ये लोकसत्ताच्या छायाचित्रकारांनी टिपली आहेत.
-
तुळशीबाग गणपतीचं भव्य रूप आणि देखावा
-
पारंपरिक पद्धतीने पालख्यांमधून गणरायांचं स्वागत करताना गणेश भक्त
-
यावेळी परदेशी पाहुण्यांचा सहभागही पाहायला मिळाला.
-
सर्व फोटो साभार: एक्सप्रेस फोटो- पवन खेंगरे

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार