-
गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं आहे.
-
सहकुंटुंब त्यांनी हे दर्शन घेतलं आहे.
-
उपमुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी यावेळी लालबाग राजाच्या चरणी माथा टेकवला.
-
यावेळी नातवालाही एकनाथ शिंदेंनी दर्शन घडवलं.
-
यावेळी त्यांनी नातू रुद्रांशला कडेवर घेतलं होतं.
-
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनीही यावेळी बाप्पाचं दर्शन घेतलं.
-
यावेळी त्यांच्या पत्नी वृषाली शिंदेही उपस्थित होत्या.
-
‘ही शान कुणाची… लालबागच्या राजाची…’, असं कॅप्शन देत एकनाथ शिंदेंच्या सोशल मीडियाव हँडलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
उपमुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं हे दर्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘पुढच्या वर्षी लवकर ये’; सायली संजीवने घेतलं मुंबईतील मोठ्या गणपतींचं दर्शन, पाहा फोटो

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी