जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्जनशील कलावंतांना तसेच कलेची उत्तम जाण असणाऱ्या रसिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येता यावे, कलेची देवाणघेवाण व्हावी या हेतून सुरू झालेला ‘राग’स्थान’ महोत्सव यंदा थरच्या वाळवंटात रंगणार आहे. -
२३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान राजस्थानच्या जैसलमेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चाळीसहून अधिक देशांतील कलावंत सहभागी होणार आहेत.
उत्तम आणि दर्जेदार संगीताचा सर्वोत्तम अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवावा हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. यंदा महोत्सवात कलावंतांना आपली कला सादर करता यावी, यासाठी मोरियो (मोर), बिराखा (पाऊस) आणि अम्मारा (तारा) असे तीन भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत -
मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद अशा शहरांतून सहभागी होणाऱ्या रसिकांची सशुल्क प्रवासाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवापूर्वी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
-
सुर्योदयापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात सुर्यास्थानंतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम चित्रपट रसिकांना मोकळ्या आकाशालाखाली पाहता येणार आहेत.
-
वाळूच्या ढिगाऱ्यावरून रोलिंग डाऊन, ४० फुट उंचीचा सी-सॉ, विविध कार्यशाळा आणि नक्षत्रदर्शनची सफर असा भरगच्च कार्यक्रम रसिकांना आनंद लुटता येणार आहे. या महोत्सवादरम्यान हार्ली डेव्हिडसनवरून बाईक राइड करता येणार आहे.

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम