-
भिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जुलै रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. डिप्रेशनमुळे सुशांतनं आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं. त्यानंतर डिप्रेशनचा मुद्दा चर्चेत आला. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पदुकोणनं त्यानंतर डिप्रेशनविषयी काही खास बाबी सांगण्यास सुरूवात केली. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस/दीपिका पदुकोण ट्विटर हॅण्डल)
-
सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
-
करिअर ऐन भरात असताना दीपिकाला डिप्रेशनचा त्रास सुरू झाला होता. त्यातून दीपिका यशस्वीपणे बाहेर पडली. त्यानंतर डिप्रेशनविषयी व त्यातून जाणाऱ्या व्यक्तींच्या त्रासाची जाणीव तिला झाली. त्यानंतर दीपिका एक स्वयंसेवी संस्था सुरू केली.
-
मानसिक आजारासोबत जगण्याचा अनुभवातून गेलेली व्यक्ती म्हणून, मी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या महत्त्वाविषयी मी सांगू शकत नाही. बोला. संवाद करा. व्यक्त व्हा. मदत घ्या. लक्षात ठेवा. तुम्ही एकटे नाहीत आहात. आपण सोबत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आशा आहे.
-
प्रसार माध्यमातील माझ्या मित्रांनो, गुन्हेगार गुन्हा करतात. लोक आत्महत्या करत नाहीत. ते आत्महत्येमुळे मरतात. खोलवर होणाऱ्या यातनामुळे त्यांच्याकडून अशी कृती घडते.
-
डिप्रेशन हा सुद्धा एक आजार आहे.
-
डिप्रेशन हा मानसिक आजाराचा प्रकार आहे.
-
डिप्रेशन हा ही इतर आजारांप्रमाणेच एक आजार आहे.
-
कर्करोग, मधुमेह या आजारांप्रमाणेच डिप्रेशन एक आजार आहे.
-
डिप्रेशन व दुःख या दोन्हीमध्ये फरक आहे. उदास वाटण हे दुःखी असण्यासारखं नाही.
-
डिप्रेशन व दुःख एकसारख नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
-
तुम्ही नैराश्येतून (अचानक) मुक्त होऊ शकत नाही.
-
डिप्रेशनविषयी अनेक गैरसमज समाजात आहेत. त्यामुळे उपचाराविषयी बोलायला लोक टाळतात. मात्र, डिप्रेशनवर उपचार केले जाऊ शकतात, असं दीपिका सांगतेय.
-
उपचारानंतर डिप्रेशनही बरं होतं.
-
त्याचबरोबर डिप्रेशन टाळता येतं, असंही दीपिकानं म्हटलं आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल