-
चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो. पूर्वी शाळेजवळ चिंचा-कैरी विकणाऱ्यांकडे आवळा हा आवर्जुन असायचा. त्यामुळे शाळेतील लहान मुलं हमखास आवळा खायचे. परंतु आता ते प्रमाण कमी झालं आहे. खरं तर आवळ्याचं प्रत्येकाने सेवन केलं पाहिजे. आवळ्याचे अनेक फायदे आहेत. दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करतात. आवळ्याचे ‘पांढरे आवळे’ आणि ‘रान आवळे’ असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. चला तर मग या बहुगुणी आवळ्याचे फायदे जाणून घेऊ.
-
डोकं शांत राहतं. तसंच केसांच्या तक्रारीही दूर होतात. केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी.
-
आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-
ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.
-
लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे.
-
नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं.
-
आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा.
-
आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.
-
आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

American Student Visa : “…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा