-
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. म्हणूनच या सुपरस्टारचं घर नेमकं कसं आहे हे आज पाहुयात.
-
मूळ चेन्नईचे असलेल्या रजनीकांत यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात घरं घेतलं असून त्यांनी अत्यंत सुंदररित्या या घराची सजावट केली आहे.
-
रजनीकांत यांचं हे आलिशान घर अत्यंत सुंदर असून डोळे दिपवणारं आहे.
-
या घरात प्रवेश केल्यानंतर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याचा भास होईल या पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे.
-
या घरात ऐशो आरामाच्या सर्व वस्तू आहेत.
-
रजनीकांत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव असून देखील त्यांचं राहणीमान अत्यंत साध आहे. आजही ते चाहत्यांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागतात. त्यामुळेच त्यांचा चाहतावर्ग अफाट आहे.
-
रजनीकांत हे केवळ कलाकार नसून तामिळ चित्रपटातील ते एक दैवी नाव आहे. पडद्यावरील त्यांची स्टाइल, त्याचा ऍटिट्यूड यांनी वेडावलेल्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे.
-
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते.
-
मात्र अभिनयाची आवड असणाऱ्या रजनीकांत यांना एका दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
-
आजवरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं. ( All Photos : Social Media )

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…