-
देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये दमदार लूक असलेल्या Jimny SUV ची पहिली झलक दाखवली होती.
-
या एसयूव्हीची पहिली झलक दिसताच Jimny SUV मारुतीच्या लोकप्रिय Gypsy ची जागा घेणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती.
-
ऑटो एक्स्पोमध्ये पहिली झलक दिसल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान हिलाही या भारदस्त गाडीमध्ये बसण्याचा मोह आवरता आला नव्हता.
-
सुझुकी जिम्नी दिसायला मर्सिडीज जी-क्सासप्रमाणे दिसते.
-
ही एसयूव्ही भारतात अनेकदा टेस्टिंगदरम्यानही दिसली होती. त्यानंतर ही गाडी लवकरच भारतात लाँच होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.
-
मारुतीने गेल्यावर्षीच भारतातील आपल्या लोकप्रिय Maruti Gypsy गाडीचं प्रोडक्शन थांबवलंय, त्यामुळे कंपनी Gypsy च्या ऐवजी Jimny लाँच करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती.
-
पण, आता कंपनीचे सीनियर एग्जीक्यूटिव डायरेक्टर सी. व्ही. रमण यांचं विधान या बहुप्रतिक्षित एसयूव्हीची वाट बघणाऱ्यांसाठी निराश करणारं ठरु शकतं.
-
सर्वप्रथम बघूया कशी आहे Jimny SUV : ग्लोबल मार्केटमध्ये दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असलेली ही SUV भारतात अद्याप लाँच करण्यात आलेली नाही.
-
सुझुकी जिम्नी सिएरा कॉन्सेप्ट एसयुव्ही म्हणजे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या मिनी एसयुव्हीचे वाइड-बॉडी (रुंद) व्हर्जन आहे.
-
सुझुकी जिम्नी ऑफ-रोड एसयुव्ही आहे, त्यामुळे या कारला जास्त ग्राउंड क्लिअरंस आहे.
-
जिम्नी सिएरा व्हेरिअंटमध्ये 1.5L K15B पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनद्वारे 100bhp पावर आणि 130Nm टॉर्क निर्माण होते.
-
जपानमध्ये उपलब्ध चौथी जनरेशन सुझुकी जिम्नी अत्यंत आकर्षक दिसते. ही लॅडर फ्रेम चेसिसवर आधारित चार-व्हिल ड्राइव एसयुव्ही आहे.
-
पिकअप कॉन्सेप्टमध्ये रेट्रो-स्टाइल वुडन साइड बॉडी पॅनल आणि हनीकॉम्ब स्टाइलमध्ये ग्रिल आहेत.
-
एलईडी स्पॉट-लाइट्स, सिल्वर स्किड प्लेट्स, ब्लॅक लोअर बॉडी क्लॅडिंग, व्हाइट फिनिश्ड रूफ, स्टील व्हिल्स आणि ऑफ रोड टायरमुळे जिम्नी कॉन्सेप्ट ढासू दिसते.
-
राउंड हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प्समुळे एसयुव्हीला शानदार लुक मिळते.
-
जिम्नीमध्ये टचस्क्रीन इन्फोटन्मेंट सिस्टिम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ड्युअल सेंसर ब्रेक सपोर्ट यांसारखे प्रीमियम फीचर्स आहेत.
-
राउंड शेप्ड हेडलॅम्पसह फ्लॅट रूफमुळे या कारला रेट्रो लुक येतो. कारची लांबी 3395mm असून 1,475mm रुंद आहे. तसेच व्हिलबेस 2250mm देण्यात आला आहे आणि ग्राउंड क्लिअरंस 205mm आहे.
-
लाँचिंगसाठी करावी लागणार अजून प्रतीक्षा…पण कारण काय? : भारतात लाँच झाल्यास या गाडीची किंमत १० लाख रुपयांच्या जवळपास असू शकते अशी माहिती आधीच्या काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे. पण, आता indiacarnews ने दिलेल्या वृत्तानुसार, ही एसयूव्ही सध्यातरी भारतात लाँच करण्याचा विचार नसल्याचं कंपनीचे सीनियर एग्जीक्यूटिव डायरेक्टर सी.व्ही.रमण यांनी म्हटलंय. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
-
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ही एसयूव्ही ३ दरवाजांच्या व्हर्जनमध्येच उपलब्ध आहे. पण भारतात ३ दरवाजांचं व्हर्जनला प्रतिसाद मिळणार नाही. कारण भारतात अशा लाइफस्टाइल एसयूव्हीची डिमांड खूप कमी आहे असं, रमण यांनी सांगितलं.
-
३ दरवाज्यांच्या जिम्नीमध्ये सामानासह केवळ दोन व्यक्ती प्रवास करु शकतात, तर सामानाशिवाय चार व्यक्ती प्रवास करु शकतात. त्यामुळे भारतात हे व्हर्जन यशस्वी ठरणार नाही. भारतासाठी ही एसयूव्ही कंपनीला ५ दरवाजांच्या व्हर्जनमध्ये लाँच करावी लागेल…त्यासाठी कंपनीला अतिरिक्त गुंतवणूकीचीही गरज लागेल. नंतर लांबी वाढवल्यामुळे गाडीच्या हँडलिंगमध्येही बदल होऊ शकतो. पण भारतात जर या सेगमेंटमध्ये डिमांड वाढली तर कंपनी ही एसयूव्ही लाँच करु शकते, असंही रमण यांनी म्हटलं आहे. ((सर्व छायाचित्र सौजन्य ट्विटर, @SirishChandran आणि @AEMotorShow))

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”