जुगाड हा शब्द कोणालाही नवीन नाही. एखादी अशक्यप्राय गोष्ट शक्य करण्यासाठी अनेक जण विविध जुगाड करत असतात. यामध्ये अनेक जण अशा काही मजेशीर गोष्टी करतात ज्याकडे पाहून समोरच्या व्यक्तीला हसू अनावर होतं.त्यामुळेच काही व्यक्तींनी शक्कल लढवत केलेले जुगाड कोणते ते पाहुयात. ( सौजन्य : जनसत्ता.) घराबाहेर जाताना सहाजिकच घराला कुलूप लावलं जातं. आता साधारणपणे लोखंडाचं किंवा अन्य धातूपासून तयार केलेली कुलूपं साऱ्यांनीच पाहिली असतील. पण कधी दाराला लावलेलं कागदाचं कुलूप पाहिलं आहे का? होय. एका व्यक्तीने घराला कुलूप लावल्याचं भासवण्यासाठी चक्क कागदाचं कुलूप करुन लावलं आहे. करोना विषाणूपासून वाचण्यासाठी तोंडाला मास्क लावणं अनिर्वाय झालं आहे. मात्र, हे मास्क लावल्यानंतर पटकन समोरच्या व्यक्तीला ओळखता येत नाही. त्यामुळे या व्यक्तीने त्याच्या टी-शर्टवर त्याचा फोटो छापून घेतला असून या हटके स्टाइलमध्ये स्वत:ची ओळख इतरांना करुन देत आहे. खरं तर मद्यपान करणं हे शरीरासाठी अत्यंत हानीकारक आहे. मात्र, अनेक जणांना प्रयत्न करुनदेखील हे व्यसन सोडता येत नाही. त्यामुळे 'क्या करे, आदत से मजबूर', असं काहीसं या व्यक्तीसोबत झालं आहे. त्याने चक्क मास्कमधून धुम्रपान करता यावं यासाठी सोय केली आहे. लाईटची बटणं, दारावरील बेलचं बटण हे त्याच जागी शोभून दिसतं. पण हे बटण कधी बाईकला पाहिलं आहे का? बऱ्याच वेळा पार्किंग करताना किंवा रस्त्यावरुन जात असताना कार, बाईक यांची टक्कर होऊन कारवर स्क्रॅच येतात. पण हे लपवण्यासाठी या पठ्ठ्याने लढवलेली शक्कल अफलातून आहे. जमिनीवर असलेलं घर सगळ्यांनीच पाहिलं आहे. पण जमिनीवर असून उलटं उभारलेलं घर कधी पाहिलं आहे का? -
अफलातून जुगाड

“त्या सीनचे शूटिंग करताना…”, ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातील किसिंग सीनबद्दल करिश्मा कपूर म्हणालेली, “आम्ही तीन दिवस…”