-
मोदक म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम मोदकावर साजूक तूप टाकून खाण्याची मज्जाच काही औरच…
-
येत्या काही दिवसात घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.
-
आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.
-
गणपती बाप्पाला दुर्वा, जास्वंद यापेक्षाही सर्वात जास्त प्रिय असलेला पदार्थ म्हणजे मोदक.
-
यामुळे गणपतीला ‘मोदकप्रिय’ या नावानेही ओळखले जाते.
-
पण गणपतीला मोदक आवडण्यामागचे नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.
-
गणपतीला मोदक आवडण्यामागे एक दंतकथा सांगितली जाते.
-
१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाशी परशुरामाने युद्ध पुकारले.
-
या युद्धादरम्यान गणरायाचा एक दात तुटला.
-
दात तुटल्याने बाप्पाला काहीही खाता येत नव्हते. त्यामुळे त्याला प्रचंड त्रास होत होता.
-
यामुळे अनेक देवी देवता गणपतीला खाण्यासाठी काय देता येईल? याचा विचार करु लागले.
-
यावेळी काहींना मोदक बनवण्याची युक्ती सुचली.
-
कारण मोदक खातेवेळी बाप्पाला त्रासही होणार नाही.
-
तसेच पुराणकाळात देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला एक मोदक पार्वती देवीला भेट दिला.
-
त्यावेळी बाप्पाने पार्वती मातेकडून मोदकांचे गुण जाणून घेतले.
-
तेव्हा बाप्पाची मोदक खाण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्यांनी तो मोदक खाल्ला.
-
हा मोदक खाऊन बाप्पा संतुष्ट झाला. त्यानंतर गणरायाला मोदक अधिक प्रिय झाले.
-
मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होते, मन आनंदी होते.
-
त्यामुळे गणपतीला मोदक प्रचंड आवडतात.

