-
स्कोडाची आगामी स्लाविया सेडान १.० लिटर टीएसआय इंजिन पर्यायासह २८ फेब्रुवारी रोजी देशात लॉन्च केली जाईल. यानंतर १.५ लिटर टीएसआय इंजिन प्रकार ३ मार्च रोजी लॉन्च केला जाईल. स्कोडा स्लावियाची अधिकृत बुकिंग आधीच देशभरात सुरू आहे. (Photo- Skoda Website)
-
नवीन स्कोडा सेडान दोन टीएसआय टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह असेल. पहिले १.०-लिटर, ३-सिलेंडर टीएसआय इंजिन आहे. हे इंजिन ११५ बीएचपी पॉवर आणि १७८ एनएम टॉर्क जनरेट करते. ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते. सेडान १.५ लिटर, ४-सिलेंडर टीएसआय पेट्रोल इंजिनसह देखील उपलब्ध असेल. हे इंजिन १४८ बीएचपी पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाईल. (Photo- Skoda Website)
-
नवीन स्लावियाची आतील मांडणी ऑक्टाव्हियासारखीच आहे. बटणे, टच बेस्ड क्लाइमेट कंट्रोल आणि टू-स्पोक स्टीयरिंग व्हील यासह त्याचे काही स्विचगियर्स आणि ट्रिम्स कुशककडून घेतलेल्या दिसतात. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डॅशबोर्ड इंटिग्रेटेड १० इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. इन्फो युनिटच्या अगदी खाली एसी व्हेंट्स आहेत. सेडानला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग पॅड, व्हेंटिलेटेड सीट्स, लेदर अपहोल्स्ट्री, ऑटो डिमिंग इंटरनल रिअर व्ह्यू मिरर, कीलेस एंट्री, कनेक्टेड कार फीचर्स आणि बरेच काही मिळते. माहितीनुसार, एंट्री-लेव्हल एक्टिव्ह ट्रिम ७-इंचाच्या टचस्क्रीन इन्फो युनिटसह येईल. (Photo- Skoda Website)
-
सुरक्षेच्या दृष्टीने, नवीन स्लाविया सेडानमध्ये ६ एअरबॅग्ज, मागे पार्किंग कॅमेरा, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट, हिल होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल सिस्टम (EDS), मल्टी-कॉलिजन ब्रेक्स आणि टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम आहे. .नवीन स्कोडा सेडानमध्ये सर्वात मोठे व्हीलबेस आहे, यामुळे अधिक लेगरूम मिळतो. (Photo- Skoda Website)
-
बाहय लुक आणि स्टाइलिंगच्या बाबतीत बोलायचं तर, स्कोडा सेडानला ब्रँडची सिग्नेचर बटरफ्लाय ग्रिल आणि L-आकाराचे DRL सह स्लीक हेडलॅम्प आणि उलटे L-आकाराचे मोटिफ असलेले फॉग लॅम्प्स मिळतात. साइड प्रोफाईल 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील (केवळ टॉप-एंड ट्रिमसाठी) आणि विंडो लाईनभोवती क्रोम ट्रिमसह सुशोभित केलेले आहे. कारच्या मागील बाजूस C-आकाराचे LED टेललॅम्प आणि क्रोम स्ट्रिपसह बंपर आहेत. (Photo- Skoda Website)
-
आगामी स्लाविया व्यतिरिक्त, स्कोडा देशात स्कोडा ऑक्टाव्हिया आणि स्कोडा सुपर्ब सेडान देखील विकते. स्लाविया स्कोडाच्या प्रीमियम सेडान लाइन-अपमध्ये सामील होईल. स्कोडा स्लाविया कंपनीच्या इतर कार, रॅपिडची जागा घेणार आहे. (Photo- Skoda Website)
-
मेड-इन-इंडिया MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर आधारित Kushaq SUV नंतर स्लाविया ही स्कोडाची दुसरी कार आहे. सेडान मॉडेल लाइनअप अॅक्टिव्ह, एम्बिशन आणि स्टाइल या तीन ट्रिममध्ये उपलब्ध असेल. नवीन स्कोडा सेडानची एकूण लांबी ४५४१ मिमी, रुंदी १७५२ मिमी आणि उंची १४८७ मिमी आहे. याचा व्हीलबेस २६५१ मिमी आहे. रॅपिडच्या तुलनेत, स्लाविया १२८ मिमी लांब, ५३ मिमी रुंद आणि २० मिमी जास्त आहे. (Photo- Skoda Website)
-
गाडी पाच रंगसंगतींमध्ये सादर केली जाईल. यामध्ये कँडी व्हाइट, टोर्नाडो रेड, कार्बन स्टील, रिफ्लेक्स सिल्व्हर आणि क्रिस्टल ब्लू या रंगांचा समावेश आहे. (Photo- Skoda Website)
-
लॉन्च केल्यानंतर, स्कोडा स्लाविया भारतीय बाजारपेठेत मध्यम आकाराच्या सेडान सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी सियाझ, ह्युंदाई व्हर्ना, होंडा सिटी आणि आगामी फॉक्सवॅगन वर्ट्सशी स्पर्धा करेल. स्कोडा स्लावियाची किंमत रु. १० लाख ते रु. १७ लाख एक्स-शोरूममध्ये असण्याची अपेक्षा आहे. (Photo- Skoda Website)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली