-
मराठमोळ्या कला संस्कृतीची एक खास ओळख म्हणजे पैठणी!
-
पैठणी हा महाराष्ट्रातील सर्वच लहान-थोर स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय.
-
पदरावचे सोनेरी मोर, आकर्षक रंगसंगती आणि ते वैशिष्ट्यपूर्ण काठ ही पैठणीची ओळख.
-
पैठणी म्हणजे साड्यांची राणी.
-
तीन हजार ते तीन लाखांच्याही पुढे एवढ्या रेंजमध्ये पैठणी विकली जाते.
-
पारंपरिक पैठणीवर मोराची नक्षी असते, पण आताच्या काळात फुलं- पानांची, कोयऱ्यांची डिझाइन्सदेखील असतात.
-
पैठणीचे पारंपरिक रंग गडद असतात.
-
पैठणी रंग म्हणजे मजेण्टा याशिवाय निळा, मोरपंखी, वांगी, चिंतामणी, पिवळा, मोतिया, हिरवा, कुसुंबी हे पैठणीचे पारंपरिक रंग आहेत.
-
खरी पैठणी आणि सेमीपैठणीमधला फरक साडी उलटी करून बघताना समजू शकतो.
-
पैठणीवरचं जरीचं विणकाम, मोर, नक्षीकाम उलट बाजूने बघताना मशीनवर केलेलं विणकाम वेगळं दिसतं.
-
हातमागावर विणलेली साडी उलट्या बाजूनेही वेगळी दिसत नाही.
-
खरी पैठणी हातमागावर बनवली जाते.
-
हातमागावर विणलेल्या साडीची बॉर्डर पुढून मागून दोन्ही बाजूने सारखीच दिसते, तर सेमीपैठणीमध्ये मागच्या बाजूला जाळी दिसते.
-
कधी संपूर्ण पैठणी हातमागावर- त्यातही प्लेन लूमवर विणली जाते तर, कधी कधी साडीची बॉर्डर डॉब्बी लूमवर विणली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्