-    उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे पायांचे सौंदर्य झपाट्याने नष्ट होऊ लागते. 
-    पायाची त्वचा निस्तेज आणि टॅनिंगने भरलेली असताना, पायावर चप्पल लागण्याच्या खुणा, टाचेला भेगा पडणे इत्यादी पायांचे सौंदर्य हिरावून घेतात. 
-    यासाठी आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे पायांच्या त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 
-    पायांच्या त्वचेची काळजी न घेतल्यास बोटांमध्ये बुरशीची समस्या, नखे तुटणे, त्वचेवर डाग येणे इत्यादी समस्या वाढू शकतात, ज्यामुळे पाय खराब दिसू शकतात. 
-    जर तुम्हाला तुमच्या पायाची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेसारखी मऊ आणि चमकदार दिसावी असे वाटत असेल, तर तुम्ही काही गोष्टी करू शकता. 
-    आज आपण अशा टिप्स जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पाय सुंदर बनवू शकता. 
-    यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही. तुम्ही हे घरी सहज करू शकाल. 
-    नखांच्या बुरशीवर उपाय : अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि त्यात पाय घालून २०-३० मिनिटे बसा. 
-    यानंतर, टॉवेलच्या मदतीने पाय कोरडे करा आणि लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब नखांवर टाकून मालिश करा. रात्रीच्या वेळी असे केल्यास चांगले होईल. 
-    एक्सफोलिएशन आवश्यक : पायाची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा गुलाबजल १ चमचा साखरेत मिसळा आणि स्क्रब तयार करा. याने पायाला चांगले मसाज करा. मृत त्वचा निघून जाईल. 
-    फूट मास्क बनवा : पायांची त्वचा उजळ करण्यासाठी, २ चमचे भोपळ्याच्या पेस्टमध्ये पाव चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा दही मिसळा. 
-    धुतलेल्या पायावर लावा आणि अर्धा तास सोडा. यामुळे पाय मऊ आणि चमकदार होतील. 
-    टाचांवरील भेगा दूर करा : टाचांच्या भेगा बऱ्या करण्यासाठी रात्री तुरटी आणि मिठाच्या पाण्यात पाय भिजवून २० मिनिटे बसा आणि नंतर ते कोरडे करा. त्यानंतर टाचांवर क्रॅक क्रीम, खोबरेल तेल इत्यादी लावा. 
-    पायाचे मालिश आवश्यक : पायाच्या चांगल्या मसाजने केवळ वेदना, अस्वस्थता, थकवा इत्यादी दूर होत नाहीत, तर पायही सुंदर होतात. 
-    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo : Pixabay) 
 
  Rohit Sharma Reaction: “टीम इंडिया…”, रोहित शर्माची भारताच्या महिला संघाच्या विजयानंतर खास पोस्ट, पाहा नेमकं काय म्हणाला? 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  