-
भारतात उन्हाळा ऋतू सुरु आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागतोय.
-
उन्हाळ्यात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कलिंगड खाल्ले जातात.
-
वास्तविक कलिंगड हे असे फळ आहे जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते.
-
हे फळ खाल्ल्याने शरीर आतून थंड राहते आणि शरीराला अनेक प्रकारे फायदाही होतो.
-
कलिंगडामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
-
तज्ञांचे म्हणणे आहे की टरबूजमध्ये ९५% पाणी असते, ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता कधीच भासत नाही आणि याच कारणामुळे लोकांना उन्हाळ्यात ते खायला आवडते.
-
परंतु हे फळ प्रत्येकवेळी गोडच असेल असेही नाही.
-
अनेकदा कलिंगड विकत घेताना तो गोड असेल की नाही हे आधीच समजून घेता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा कमी गोड किंवा लाल नसलेले कलिंगड आपण घरी घेऊन येतो. अशावेळी आपला भ्रमनिरास होतो.
-
आज आपण अशा काही टिप्स जाणून घेऊया ज्यामुळे तुम्ही योग्य कलिंगडाची निवड करू शकता.
-
बरेच लोक हिरवे कलिंगड खरेदी करतात. उलट हलके पिवळे टरबूज अधिक गोड आतून लाल देखील असते. कलिंगडाच्या तळाशी जितके अधिक पिवळे डाग असतील तितके कलिंगड अधिक गोड असेल.
-
तुम्ही कलिंगड विकत घ्यायला गेलात तर कलिंगड उचलून हलक्या हाताने तो ठोका.
-
जर त्यातून विशिष्ट आवाज आला तर तो कलिंगड गोड असेल. पण तो गोड नसेल तर आवाज येणार नाही.
-
कलिंगड विकत घेताना, त्यावर छिद्र नाहीत ना किंवा ते कापले किंवा फाटलेले नाही याची खात्री करा.
-
आजकाल, कलिंगड लवकर वाढण्यासाठी, लोक हार्मोनल इंजेक्शन देतात ज्यामुळे आरोग्यास हानी पोहोचते.
-
जर तुम्हाला कलिंगड जड आणि भरलेले आढळले तर त्याची चव चांगली नसेल, पण जर कलिंगड वजनाने हलके वाटत असेल तर ते चवीला चांगले असते.
-
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. सर्व फोटो : Pexels

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग