-
घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. वास्तूनुसार मनी प्लांट घरात ठेवल्याने धनप्राप्ती होते. घराव्यतिरिक्त तुम्ही हे झाड ऑफिस किंवा दुकानातही ठेवू शकता. आर्थिक संकटापासून दूर राहण्यासाठी लोक याचा वापर घरीही करतात. (Photo: Freepik)
-
पण तुम्हाला माहितेय का, की घरात मनी प्लांट ठेवण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. मनी प्लांटशी संबंधित एक छोटीशी चूक माणसाला वाईट दिवस दाखवू शकते. हे मनी प्लांट ज्या प्रमाणे धनप्राप्ती देते, त्याचप्रमाणे काही चुकीच्या पद्धतीमुळे आर्थिक नुकसानही देऊ शकते.(Photo: Pexel)
-
घरात कधीही तुटलेले किंवा वाळलेली पानं असलेलं मनी प्लांट लावू नये. असे पानं आर्थिक समस्येचे संकेत देतात. (Photo: Pexel)
-
मनी प्लांट ठेवण्यासाठी योग्य दिशा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावं. ही दिशा मनी प्लांटसाठी खूप शुभ मानली जाते.(Photo: Pexel)
-
चुकूनही मनी प्लांट उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला लावू नये. असं केल्यानं आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. घरातील व्यक्ती यामुळे आजारी पडतात. आर्थिक नुकसान होऊ शकते.(Photo: Pexel)
-
मनी प्लांट वनस्पती खूप वेगाने वाढते. त्यामुळे मनी प्लांटच्या वेलींना कधीही जमिनीवर स्पर्श होऊ देऊ नका. तुम्ही दोरी किंवा काठीच्या साहाय्याने वेली वर उचलू शकता. मनी प्लांटच्या वेली प्रगती आणि शांततेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांना जमिनीवर कधीही विखुरू देऊ नका.(Photo: Pexel)
-
वास्तूनुसार घरामध्ये सुकणारे मनी प्लांट मानवी दुर्दैवाचे प्रतीक आहे. त्यामुळे घराची आर्थिक परिस्थितीही बिघडते. त्यामुळे मनी प्लांटला नियमित पाणी देत रहा. जर त्याची पाने सुकायला लागली तर ते भाग लगेच कापून टाका. (Photo: Pexel)
-
मनी प्लांटची रोपे नेहमी घरामध्ये ठेवावीत. या वनस्पतीला वाढण्यासाठी जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. वास्तूनुसार घराबाहेर कधीही मनी प्लांट लावू नये. असे करणे अत्यंत अशुभ आहे. ही वनस्पती बाहेरच्या वातावरणात झपाट्याने सुकते. त्याची पाने सुकली की माणसाची आर्थिक स्थिती बिकट होते. (Photo: Pexel)
-
वास्तूनुसार मनी प्लांटचा प्लांट कधीही कोणालाही भेट देऊ नये. त्यामुळे नाराज होतो असे म्हणतात. शुक्राला सुद्धा सुख आणि शांतीचे प्रतिक मानलं जातं. त्यामुळे मनी प्लांटचे रोप इतरांना भेट देणे टाळा. (Photo: Pexel)

“बलात्कार करायला घरी माणसं पाठवू, अशा धमक्या देतात, माझ्या मागे…”, आमदार परिणय फुकेंच्या भावजयीचे फुके कुटुंबावर गंभीर आरोप