-
प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला डासांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र पावसाळ्यात हा त्रास अधिकच वाढतो. (Photo : Pexels)
-
या त्रासापासून स्वतचा बचाव करण्यासाठी लोक मच्छर प्रतिबंधक, मॉस्किटो कॉइल आणि मच्छर मारण्याचे रॅकेट यासारख्या गोष्टींचा वापर करतात. (Photo : Pexels)
-
पावसाळ्यात डासांना पळवण्यात अपयश येते. अशावेळी डास चावल्यामुळे त्वचेला सूज येणे, खाज येणे, त्वचेचे संक्रमण यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (Photo : Pexels)
-
आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. (Photo : Pexels)
-
विशेष म्हणजे हे घरगुती उपाय आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केला जाणार नाही. (Photo : Pexels)
-
डास चावल्यावर कडुलिंबाची पाने आणि मध यांचे मिश्रण लावल्याने आराम मिळतो. (Photo : Unsplash/Pixabay)
-
तुळस कोणत्याही प्रकारच्या परजीवी संसर्गावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याची पाने बारीक करून पेस्ट लावल्याने आराम मिळतो. (Photo : Unsplash)
-
कोरफडीचा रस नैसर्गिक रोग प्रतिरोधक मानला जातो, त्यात वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. (Photo : Pexels)
-
डासांच्या चावण्याने जास्त त्रास होत असल्यास त्वचेवर लिंबाचा रस लावावा. तुम्हाला होत असलेला त्रास यामुळे कमी होईल. (Photo : Pixabay)
-
गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप हे अँटीहिस्टामाइन्सचे स्त्रोत आहे जे कीटकांच्या चाव्याव्दारे होणाऱ्या वेदना आणि अस्वस्थतेपासून आराम देते. (Photo : Unsplash)
-
डास चावल्यावर त्वचेवर नारळाचे तेल लावल्यास आराम मिळू शकतो. (Photo : Pexels)
-
त्वचेवर कांद्याचे तेल लावल्याने डासांचा त्रास दूर होतो. (Photo : Freepik)
-
डासांच्या त्रासावर पुदिन्याचे तेल गुणकारी ठरते. (Photo : Freepik)
-
या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी कापूरचे तेल उपयुक्त ठरू शकते. (Photo : Freepik)
-
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo : Pexels)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”