-
बाहेरचे जंक फूड खाल्ल्याने शरीराच्या पाचनक्रियेवर मोठा परिणाम होत. विशेषतः प्रवासात आपण जेव्हा बाहेरचे पदार्थ खातो त्यावेळी पोटात गडबड होते. या गडबडीमुळे उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू होतो.
-
यामुळे तुमच्या ट्रिपच्या आनंद खराब होऊ नये म्हणून तुमच्यासाठी काही ट्रिक्स घेऊन आलो आहोता. या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमची ट्रिप एन्जॉय करू शकता.
-
लिंबू सरबत : प्रवासादरम्यान पोट स्वस्थ ठेवण्यासाठी आणि उलटी होऊ नये यासाठी हा उपाय खूप जुना आणि उपयोगाचा आहे. प्रवास करताना सोबत लिंबू ठेवा आणि प्रत्येक दोन तासांनी त्याचं सरबत बनवून पीत राहा.
-
कमी पाणी प्या- काही लोक प्रवासात कोणताच त्रास होऊ नये यासाठी लागोपाठ पाणी पीत राहतात. यामुळे कधी कधी उलटी किंवा मळमळल्यासारखं होऊ लागतं. उलटीचा त्रास सुरू झाला की मग पोटात दुखणं सुरू होतं. त्यामुळे असं करू नका.
-
हलका आहार घ्या – कारमधला प्रवास असो वा मग रेल्वेतला…कोणत्याही प्रवासात सोबत हलका आहारच घ्यावा. ज्या लोकांना प्रवासात पोटात गडबडीचा त्रास होत असतो अशांनी सोबत काही फळं सोबत घ्यावी जी पचायला जड जाणार नाहीत आणि अॅसिडीटीचा त्रास देखील होणार नाही.
-
दही : जर तुम्हाला प्रवासात पोटात गडबडीचा त्रास सुरू झाला तर अशा वेळी दही किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ खा. तसंच दह्यात साखर घालून खा. यामुळे पोटात थंडावा पडेल. (All Photos: Pixabay )
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस