-
केशरला अरबी भाषेत जाफरन म्हणतात, त्याचे फायदे अनेकदा चर्चिले जातात. सौंदर्यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांमध्ये याचा उपयोग होतो.
-
केशर जेवणाची चव वाढवते. तसेच रंग वाढवते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे त्यातील काही फ्लेक्स तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
-
यात नैराश्याशी लढण्याचे गुणधर्म आहेत. वजन कमी करण्यासही मदत होऊ शकते.
-
स्त्रियांमध्ये मूड स्विंग सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान महिलांनाही याचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत केशर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, ते सेरोटोनिनच्या उत्पादनात मदत करते. हे रक्त प्रवाह वाढवून तुमचा मूड नियंत्रित करते.
-
केशर भूक कमी करते. जेवणात केशरच्या काही तुकड्यांचा समावेश केल्यास तुम्ही स्नैकिंगपासून वाचता येतं. त्यामुळे पोटाची चरबीही कमी होते.
-
केशर मुक्त रॅडिकल्सला न्यूट्रल करते. कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी हे फ्री रॅडिकल्स जबाबदार असतात.
-
केशरमध्ये सेक्स ड्राईव्ह वाढवणारे गुणधर्म देखील आहेत. हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लैंगिक ऊर्जा देते. वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनाही केशर खाण्याचा सल्ला दिला जातो.
-
केशराचा वापर सौंदर्यासाठीही केला जातो. त्यामुळे रंग सुधारण्यास खूप मदत होते. ते दुधात भिजवून चेहऱ्यावर लावता येते.
-
केशर खाणे आणि वास घेणे PMS लक्षणे जसे की चिडचिड, डोकेदुखी, वेदना आणि चिंता यांवर उपचार करण्यास मदत करते. (All Photos: Freepik)

शनीच्या महादशेने ‘या’ राशींचे लोक होतील कोट्यधीश! १९ वर्षे प्रभाव टिकत मिळणार अमाप संपत्ती