-
हिवाळ्यातील धुके, वातावरणात होणारे बदल, प्रदूषण या कारणांमुळे तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
-
वातावरणातील या बदलामुळे दमा किंवा श्वासाशी निगडित आजार असणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असते, इतकेच नाही तर अशा समस्या नसणाऱ्यांना देखील नव्याने काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
-
अशावेळी वायुप्रदूषणापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
-
तुळशीचा रस : तुळशीचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर मानला जातो.
-
याचे सेवन श्वसन संस्था आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
-
हळदीचे दूध : हळदीमध्ये अँटीइन्फ्लामेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हळदीचा रोजच्या जेवणात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
-
हिवाळ्यात सतत घशाची खवखव होते, यावर देखील हळद गुणकारी औषध मानले जाते.
-
तसेच हळदीमध्ये आढळणारे करक्यूमिन अॅसिड शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करते. त्यामुळे दुधामध्ये हळद टाकून त्याचे नियमित सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
-
आले : आल्यामध्ये अँटी- इन्फ्लॉमेंटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
-
बॅक्टेरिया, व्हायरस यांमुळे हिवाळ्यात बळावणाऱ्या आजरांपासून वाचण्यासाठी आले फायदेशीर ठरते. तसेच दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी देखील आले फायदेशीर ठरते.
-
आंबट फळं : आंबट फळांच्या सेवनाने विषारी वायुमुळे शरीरावर होणाऱ्या प्रभावापासून संरक्षण मिळण्यास मदत मिळते.
-
यासाठी बदलत्या वातावरणात लिंबू, आवळा, संत्री या ‘विटामिन सी’युक्त फळांचा रोजच्या आहारात समावेश करावा.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)
-
(फोटो सौजन्य : Freepik)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..